कोकणात रासायनिक झोन नको
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,आम्हा कोकण वासियांना आजून उध्वस्त करू नका,तुम्हाला केमिकल झोन ची खूप हौस असेल तर तुम्ही नागपूर विदर्भात खुशाल तुमची हौस भागवा,पण कोकणाला उध्वस्त करण्याचा तुमचा हा डाव आम्ही यशस्वी होवू देणार नाही.
आमचा विकासाला कोणताही विरोध नाही पण मागील सरकारने विकासाच्या नावाखाली जे कारखाने कोकणात उभारले त्या कारखान्यांनी कोकणात हैदोस माजून ठेवला आहे,रासायनिक कंपन्यांनी नदीच्या पत्रात टाकाऊ रसायनांमुळे नदी,नाले,खाड्या प्रदूषित झाले आहेत.
जल व वायू प्रदूषणामुळे लोकांना पोटाचे,त्वचेचे,डोळ्याचे,घशांचे विविध प्रकारचे विकार होत आहेत.कन्सर सारखा रोग कोकणात खूप प्रमाणात वाढला आहे.
पिण्याचे पाणी दुषित झाले आहे,हवा दुषित झाली आहे.
या प्रदूषणामुळे जमीन,वनराई नापीक झाली आहे
नद्या नाल्यांमधील जलजीवन उध्वस्त झाले आहे. मासेमारीवर आपला उदरनिर्वाह करणारे कोळी,आदिवासी समाजाची उपासमार होत आहे.
हया सर्व रासायनिक कंपन्यांचा दुष्परिणाम कोकणातील निसर्ग रम्य नैसर्गिक श्रुष्टी वर होत आहे.
सुंदर हिरवी घनदाट जंगले असलेल्या कोकणातील आंबे,नारळ,सुपारी,फणस,काजू,कोकम,करवंद,बोरं अशी अनेक चविष्ट व पौष्टिक फळे कोकणाच्या मातीत निर्माण होतात.या फळांचे उत्पन्न कमी होत आहे.
या फळांवर प्रक्रिया करणारे कारखाने निर्माण करून,व शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन देवून उद्युक्त केले पाहिजे.
त्यायोगे कृषी व्यवसायाला पुनर्संजीवनी मिळून कोकणातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल.
या महत्वाच्या बाबींकडे या आधीच्या लोकप्रतिनिधी व स्थानिक जनतेने दुर्लक्ष केल्यामुळे कोकणात काही ठिकाणी रासायनिक कारखाने उभे राहिले. आता त्याचे दुष्परिणाम त्या त्या भागातील लोकांना भोगावे लागत आहेत.
निसर्गरम्य कोकणाची होणारी हानी टाळण्यासाठी रासायनिक कारखान्यांना प्रखर विरोध केलाच पाहिजे.
http://www.amazon.in/gp/product/B010NE3U2M/ref=as_li_qf_br_asin_il_tl?ie=UTF8&camp=3626&creative=24790&creativeASIN=B010NE3U2M&linkCode=as2&tag=drriazpathanb-21
http://www.amazon.in/gp/product/B010NE3U2M/ref=as_li_qf_br_asin_il_tl?ie=UTF8&camp=3626&creative=24790&creativeASIN=B010NE3U2M&linkCode=as2&tag=drriazpathanb-21
No comments:
Post a Comment