Tuesday, 1 September 2015

छत्रपती शिवाजी आणि इस्लाम

छत्रपती शिवाजी आणि इस्लाम


                                                     

           


















                                                                   
                                                                  छत्रपती
                                                       शिवाजी आणि इस्लाम


 प्रस्तावना :-

मी पुणे जिल्ह्यात जन्म घेतलेला एक मावळा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.
माझा हा लेख शिवाजीराजें बद्दल मुसलमानांमध्ये जे गैरसमझ आहेत ते दुर करण्याचा एक प्रयत्न आहे.
आम्ही मुसलमानांमध्ये शिवाजी राजे हे कट्टर हिंदुत्ववादी होते व ते कट्टर मुस्लिम विरोधी होते अशी चुकीची भावना लहाण पणा पासुन आमच्या नसा नसात बिंबवण्यात आली आहे
कोणी बरं असं केलं ? व का केलं ?
कोणी आणि का असं केलं याचं उत्तर मला शोधयला हवं. 
यात किती सत्यता आहे हे जाणण्यासाठी मी शिवाजीराजेच्या चरीत्राचा आभ्यास केला व मला हे जाणवले काही विशिष्ट प्रकारच्या लोकांनी जे शिवाजी राजेंना हरवु शकले नाही त्यांच्या विचारांना दाबुन ठेवण्यासाठी त्यांच्याबद्दल आपल्या सोयीप्रमाणे लोकांना शिवाजीराजेंबद्दल लिहीण्यात व सांगण्यात आले व त्याचे ढोल-ताशे वाजवून प्रचार करण्यात आले. 

परंतु शिवाजीराजे हे मुस्लिम विरोधी नव्हते


हा लेख विविध लेखांतून घेतलेले संकलन आहे कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास कृपया निदर्शनास आणावे. 


थोडंस माझ्या बद्दल 

मला शिवाजी राजेच्या स्वराज्यात जन्म घेतल्याचा अभिमान आहे. शिवाजी राजे  यांना १६८० साली देवाज्ञा झाली व बरोबर ३०० वर्षा नंतर जेथे राजेचं जन्म झाल त्या शिवनेरी च्या पायथ्यापाशी असलेल्या जुन्नर येथे १९८० साली मी जन्म घेतला, ज्या प्रमाणे शिवाजी राजेंची जन्म भुमी ही जुन्नर (शिवनेरी) व कर्म भुमी रायगड त्याच प्रमाणे मी जुन्नर येथे जन्म घेतला व रायगड जिल्ह्यात लोकांची वैद्यकीय मार्फत जनसेवा करीत आहे. पण मला शिवाजी राजे कळायला तब्बल ३५ वर्ष लागली .

मी शिवनेरीच्या पायथ्याशी १९८० साली जन्म घेतला पण मला शिवाजी राजे कळायला खुप उशीर लागला, का बरं असं झाले ? की काही दंडेलशाही,भांडवलशाही,सरंजामशाही करणाऱ्यांनी खरा शिवाजीराजे लपवुन ठेवला का ?

मी आज आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमे पासून प्रेरणा घेतली व इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनात उतरलो व नंतर अरविंद केजरीवाल यांच्या बरोबर त्यांच्या देशात परिवर्तन घडविण्याच्या लढाईत साथ देत आहे, माझ्या मनात नेहमी विचार येतो जर का मी शिवकाळात जन्मला असतो तर नक्की शिवाजी राजे यांच्या बरोबर ईमाने इतबाराने लढणारे मुसलमान खान पठाण सैनिकांपैकी एक असतो किंवा बहुतेक ५००-७०० पठाण जे राजेंच्या सेनेत सामील झाले ते आमचे पुर्वज आसावे.
आदिलशहा,निजामशहा,मुघल हे नक्कीच आमचे पूर्वज नसतील,असतिल तर राजेंच्या तोफखाना संभाळणारा इब्राहीम खान किंवा राजेंचा अरमार संभाळणारा दर्यासारंग दौलतखान किंवा राजेंचा अंगरक्षक मदारी म्हेतर किंवा राजेंचा वकील काजी हैदर किंवा शिवाजी राजेंचा विश्वासु सरदार सिद्दी हीलाल यांच्या पैकी कोणीतरी असेल.

जेव्हा मी ऐकतो एका शेताच्या बांध्यावर एक कोवळा मुलगा सशस्र सैनिकाला म्हणतो "खबरदार जर पुढे जाल... " तर मला नेहमी अशी कल्पना मनात येई बहुतेक ते शेत आमचेच आसावे.नंतर त्या मुलाला माहित पडते तो सैनिक दुसरा कोणी नाही शिवाजी राजे आहे. किती फिक्र होती रयतेला स्वराज्याची. 

 माझे आजोबा जे अजुन ह्यात आहेत, भारत स्वतंत्र पुर्व काळात मुंबई डॉक्स येथे काम करीत होते,जेव्हा गांधीजींनी स्वदेशी वापरा व विदेशी वस्तुंची होळी करा आंदोलन सुरु केले तेव्हा माझ्या आजोबांचा साथीदार जहाजातुन देशात विकण्यासाठी आलेल्या विदेशी मालाच्या मोटारगाडी समोर झोपला व विदेशी परत जा चा नारा देऊ लागला पण क्रुर इग्रजाने त्याच्या पोटावरुन गाडी हकली व तो तेथेच मरण पावला,त्या साथीदाराचे नाव बहुतेक तुम्हाला माहीत आसावे त्याचे नाव होते बाबु गेणु जो आमच्या जुन्नर च्या शेजारील तालुक्यातील छोट्याशा महाळुंगे गावचा होता,मी लहाणपणी जेव्हापण ही गोष्ट ऐकत असे माझे रक्त उसळे व जर मी असतो तर इग्रजांना धडा शिकविला असता असे नेहमी वाटत असत,नंतर १९४२ च्या दुसऱ्या महायुध्दाच्या काळात जर्मन पाणबुडीने समुद्रात उभे असलेल्या इंग्रजांच्या सशस्त्र जहाजाला उडविले व मुंबई दोन दिवस आंधारमय झाली,सर्व कडे काळा धुरच धुर,आजोबांना लगेच गावी परत बोलवण्यात आले व शेती संभाळायला लावले.

आज जुन्नरच्या दादोजी कोंडदेव यांच्या वाड्यात तहसीलदार यांचे कार्यालय,न्यायालय व पोलीस स्टेशन आहे,कधी मनात विचार येतात ज्या वाड्यात नेहमी रयते बरोबर न्याय झाला तेथे कोणी जर लाच घेऊण काम करीत असेल तर ? किती शर्म ची बात आहे. 

 दादोजी कोंडदेव यांच्या वाड्याच्या अगदी समोर शिपाई मोहल्ला आहे जेथे शिवनेरी किल्याची सुभेदारी करणारे सुभेदारांचे वंशज आजही राहतात,आणि येथे मला वर्णन करावे से वाटते ते सर्व सुबेदार हे मुस्लिम आहेत.

 त्या काळात हिंदु-मुस्लिम हा विषय नव्हताच,जनतेला कोण राज्य करत आहे याच्याशी कोणत्याही प्रकारचे घेणे देणं नव्हतं.

 राज्य कौन करतो त्याच्याशी जनतेला काहीही घेणं देणं नाही,त्याच्या जातीशीही काही घेणं देणं नाही,त्यांना फक्त घेणं देणं होतं ते सुबेदार,बलुतेदार,खोत,देशमुख,गाव पाटील यांच्याशी,आणी ही सर्व लोकं कोणीही राजा असो त्यांना बरोबर त्यांचा हीशोब हिस्सा पाठवत असे, जसे आज खालपासून वर पर्यंत पाकीट पाहोचतात तसे. 

जग चिंतित आहे फक्त एका दहशतवादाशी पण आमच्या कडे विविध प्रकारचे दहशतवाद आहेत,येथे राजकिय दहशतवाद,सामाजिक दहशतवाद,प्रांतिय दहशतवाद,धार्मीक दहशतवाद,सांस्कृतिक दहशतवाद आहेत.
चला आपण शिवाजी राजेंन बद्दल समाजामध्ये जी दहशत दाखवण्यात आली त्यात किती सत्यता आहे ते जाणून घेवू या.  





छत्रपती शिवाजी आणि इस्लाम 


शिवाजी राजे कट्टर हिंदुत्व वादी होते का ?
शिवाजी राजे मुस्लिम विरोधी होते का ?
छत्रपति शिवाजी महाराज कोणाविरूध्द लढले❓
पुस्तकातील उत्तर  - मुस्लिमांविरुध्द
पण हे खरं आहे का हो ?
हे प्रश्न असे आहे ज्यांच्यावर राजकारण करुन काही राजकारणी वर्षांनुवर्षे पोळ्या भाजत आहेत.व त्यांच्या राजकारणाचा बिऱ्हाड चालवत आहेत.
पण या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे,आणि ते म्हणजे शिवाजी राजे हे मुस्लिम विरोधी नसुन तर त्या काळातील राजेशाही विरोधी होते.
आपणास माहीतच असेल शिवाजी राजेच्या काळात मुगलशाही,आदीलशाही व निजामशाही होती.
पण या सर्व शाहींची सेना,सेनापती,सरदार हे मुसलमान होते का ?
तर याचे उत्तर आहे 'नाही' त्यांचे ज्यादातर सर्व सेना,सेनापती,सरदार हे सर्व धर्माचे म्हणजेच मराठा,राजपुत,जाट,सीख होते.
एव्हडच नव्हे तर शिवाजीराजेंचे वडील शहाजीराजे हे कधी आदीलशाही कधी निजामशाही तर कधी मुघलशाही मध्ये त्यांचे खास सरदार होते तर शिवाजी राजेंचे आजोबा म्हणजेच जिजामाता यांचे वडील लाखोजी जाधव जे सिंदखेड राजा चे राहणारे हे निजामशाही मध्ये सरदार होते व हे कधीही शिवाजीराजे यांच्या सेनेत शामील झाल्याचे आढळत नाही.
म्हणजेच शिवाजी राजेंच्या विरोधात मराठेपण होते का ? तर उत्तर आहे हो.
कारण राजेंचा मुख्य उद्देश हिंदुत्व नसुन "स्वराज्य"हा होता,आणि स्वराज्य मिळवण्यासाठी गरज पडली तेव्हा त्यांनी मराठ्यावर सुध्दा तलवार ताणली.
शिवाजी राजेंचा इतिहास जातीय व धार्मीक मांडल्यामुळे शिवाजी हा फक्त मुस्लिमांच्या विरोधात लढला जाणीवपुर्वक ठासुन काही लोकांनी सांगितले, जावळीचे मोरे, अफजल खानाचा वकिल कृष्णा भास्कर कुलकर्णी, व खंडोजी खोपडा हे तर हिंन्दू सरदार शिवाजी राजेंच्या विरुद्ध लढले.

       कारण एकच,जे लोक शिवाजी राजेंना हरवू शकले नाही त्यांनी जाणीवपूर्वक शिवाजी राजेंचे विचार रयते पर्यंत पहचु नये म्हणून चुकीचा इतिहास लोकांसमोर ठेवला व सामान्य जनतेमध्ये, मुस्लिमांमध्ये शिवाजी राजेबद्दल द्वेष पसरविण्यात आले,खरतर हा देशद्रोह आहे व अशा लोकांना जर शिवाजी राजे असते तर तोफे ने उडवून दिले असते.









स्वराज्य

रयतेचे राज्य 

शिवाजीराजे हे खुप दुरदर्शी होते त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहीले होते,म्हणजे गुलामगीरी मुक्त स्वतः रयतेचे राज्य,जेथे रयतेला कोणीही छळणार नाही व सर्व आनंदाने, गुण्यागोविंदाने राहतील.
स्वराज्याचा अर्थ हिंदुत्व असा मुळीच नव्हता,किंवा शिवाजी राजेंच्या स्वराज्य हा मुस्लिम रहीत राज्य असा ही मुळीच नव्हता.
स्वराज्याचं जे स्वप्न राजेंनी पाहीलं त्यात सर्व धर्म सम भाव संकल्पना होती.रयते ला वाटावे "हे माझे राज्य आहे" ते स्वराज्य.
शिवाजी राजे यांच्या प्रती रयतेची जी प्रीत होती ती अगळी-वेगळीच होती,ती प्रीत राजेंनी रयतेच्या ह्रुद्यात उतरुन मिळवलेली त्यांची सर्वात मोठी संपत्ती होती. 


शिवाजी राजे व औरंगजेब संबंध

शिवाजीराजेंचा प्रमुख संबंध आला तो मुघल बादशाह औरंगजेबशी,
इतिहासात औरंगजेब बादशहा हा एक क्रूर राज्यकर्ता म्हणून नोंद आहे,हा एक संशोधनाचा विषय आहे. पण औरंगजेब ने आपल्या सख्या मोठ्या भावाला मृत्युदंडाची शिक्षा दिली,वडिलांना नजरकैद केले व स्वतः राजगादी वर विराजमान झाला व ४९ वर्ष राज्य केले.
आलमगीर औरंगजेब हा आपल्या काळातील कुशल सेनापती,युद्धनीतीतज्ञ,आणि मुत्सद्दी असा राजा होता.जेंव्हा तो आपल्या लक्षावधींच्या फौजा घेऊन दक्षिणेत उतरला त्या वेळी त्या संघर्षाचे स्वरूप धार्मिक नव्हते. औरंगजेबच्या सेनेत लाखांनी मोजावे एवढे मोठे प्रमाण हिंदू सैनिकांचे होते. हा लढा कधीच दोन धर्मांमध्ये नव्हता,औरंगजेब हा फक्त मराठयांचे राज्य नव्हे तर आदिलशाह,निजामशहा हे मुस्लिम राज्य नष्ट करण्यासाठी आला होता. त्याच बरोबर आदिलशाह,कुतुबशहा यांच्या सेनेत सुद्धा कितीतरी मराठे सरदार होते.
तसेच शिवाजीराजेंची भूमिका फक्त मराठयांचे राज्य नाही तर हिंदवी स्वराज्याची होती,त्यावेळी स्वराज्य हे कर्नाटक,तामिळनाडू पर्यंत पसरलेले होते.शिवाजी राजेंना हिंदू राज्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे होते आणि हीच "श्रीं " ची म्हणजे ईश्वराची इच्छा आहे असे ते मानत असे.
शिवाजी राजे व औरंगजेब यांची प्रत्येक्ष भेट फक्त एकदाच आग्रा येथे झाली होती.आणि ती राजेंची औरंगजेब बरोबर पहिली आणि शेवटची भेट होती,शिवाजीराजेंनी औरंगजेब जेव्हा राजगादी वर बसला तेव्ह्या त्यास नजराणा पाठवले होते. औरंगजेबाने परिस्थिती जाणून शिवाजीराजे बरोबर सलोखा केला होता.
औरंगजेब याचा जन्म १६१८ साली झाला तर शिवाजीराजे यांचा जन्म १६३०  साली झाला,औरंगजेब हा प्रामुख्याने दख्खन चा भाग संभाळत होता.तो १६५८ साली सत्तेवर आला
४९ वर्ष सत्ता केली व वयाच्या ९० व्या वर्षी १७०७ ला खुलदाबाद येथे मरण पावला.
शिवाजी राजेंचा १६७४ साली राज्यअभिषेक झाला व १६८० साली राजेंना देवाज्ञा झाली.
औरंगजेब हे मुगल बादशाह होते ते दक्षिणेचा भाग प्रामुख्याने सांभाळत होते,दक्षिणेत मुघल,आदिलशाह,निजामशहा आणि मराठे यांच्यात नेहमी लढाया होत असे
जेव्हा शिवाजी राजेंनी स्वराज्य स्थापन केले तेव्हा औरंगजेबला दक्षिणेत खुुप झुंझ दयावी लागत होती,
स्वराज्य हस्तगत करण्यासाठी दिल्लीचे बादशहा नेहमी प्रयत्न करीत होते.





शिवाजी राजे यांनी औरंगजेब ला फारशी भाषेत जिजीया कर बद्दल एक पत्र लिहिलीले आहे त्या पत्रात त्यांचा मुस्लिमांबद्दल चा दृष्टीकोन स्पष्ट जाणवतो.
शिवाजीराजेंचे फारशी भाषेतील पत्र दफ्तरदार नीळप्रभू पारसनीस यांनी लिहिले आहे.

शिवाजीराजे यांचे औरंगजेबला पत्र














चला आपण थोडंस ह्या पत्राबद्दल विश्लेषण करूया



 जिजिया कर म्हणजे मुस्लिम खेरीज इतर धर्मांतील कमाऊ व्यक्तीवर लागणारा कर
अकबर बादशहा ने जिजिया कर रद्द केले होते,शहाजहान जेव्हा सत्तेवर आला त्याने लालकिल्ला,जामा मशीद,ताजमहल सारख्या वास्तु बांधल्या व सर्व संपत्ती संपवुन टाकली.
जेव्हा औरंगजेब सत्तेवर आला शाहजहान ने जनतेचा पैसा संपवल्या बद्दल आग्रा येथे नजरकैद केले व परत संपत्ती हस्तगत करण्यासाठी जिजिया सारखे कर लावले.

येथे शिवाजी राजे यांनी औरंगजेब बद्दल वापरलेल्या भाषेतून त्यांच्यातील त्या वेळचे सबंध जाणवतात व शिवाजीराजेंना असलेली रयतेची काळजी जाणवते.   

 "परंतु यथायोग्य सेवेचे सांप्रदायांत हजर आहे.ती चांगली सेवा व उत्तम प्रयत्न.आपले अंतकरण समुद्रा प्रमाणे आहे व आपल्याला कळलेच असेल,व कित्येक गोष्टी ज्यात आबाल वृध्दांचे कल्याण आहे आपल्या बद्दल लिहील्या जातात.सांप्रत आम्ही इकडे आल्यावर पादशाही खजिना रिकामा जाहला व सारे द्रव्य खर्च झाले. याजकरीता हिंदु लोकांपासुन जजिया पट्टीचे द्रव्य उत्पन्न करुन पादशहातीचा क्रम चालविला आहे ऐसे ऐकण्यात आले."

बादशहाचा खजिना रिकामा झाला व सर्व पैसे खर्च झाले ( शाहजहान बादशहा ने दिल्लीचा लाल किल्ला,जामा मस्जिद,आग्रा ला ताजमहल बनविण्यासाठी सर्व खजिना खर्च केला होता ) यांजकरीता गैरमुस्लिम लोकांकडुन जिजिया कर लावण्यात आले होते.

 "त्यास पूर्वी अकबर बादशहा याणी न्यायाने बावन्न वर्षे राज्य केले.यामुळे इसवी व दाउदी व महमदी वगैरे याती खेरीज ब्राह्मण व शेवडे वगैरे हिंदु लोक यांचे धर्म चांगले चालले व त्या धर्माचे संस्थापनाविषयी ते बादाशाही मदत ठेवीत होते याजकरता जगतगुरु अशी त्यांची प्रसिध्दी जाहली व अशा सद्वासनेच्या योगाने हरएक स्थळी त्यांची नजर पडत होती तेथे यश येत होते व कित्येक मुलूख सर केले."

शिवाजी राजे अकबर बादशहा बद्दल लिहीतात व त्यांनी ५२ वर्ष केलेल्या राज्याची आठवन करुन देत आहे व त्यांनी इसवी,दाउदी,महमदी,ब्राह्मण,शेवडे, हिंदु अशा सर्व धर्माना सन्मान दिला, दान धर्म केले,त्यांना मदत करीत म्हणुन त्यांना 'जगतगुरु' अशी प्रसिध्दी मिळाली होती,आणी त्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असे व त्यांनी कित्येक मुलूख सर केले.
व नंतर जहागीर बादशहाने २२ वर्षे देवाच्या कुपेने राज्य केले. शहाजहानने ३२ वर्षे चांगले राज्य केले व किर्ती मिळवली
या सर्वांनी चांगली किर्ती व बेशुमार दौलतही मिळवली
असे त्यांनी ( औरंबजेबाच्या पुर्वजांनी ) प्रताप व परक्रम केलेत,त्याची आमलगीर (औरंगजेब ) यांनी फिकीर करावी,
ते सुध्दा (अकबर,जहांगीर,शाहजहान हे औरंगजेब चे पूर्वज ) जिजिया कर घेण्यास समर्थ होते पण त्यांनी कोणालाही धर्माला अडविले नाही व जुलूम करण्याचे मनात आणले नाही.त्यांच्या उपकाराची किर्ती अद्याप आहे व अजुन लोकं त्यांची स्तुती करतात.
जशी नियत तशी त्यास बरकत
त्या बादशहांची दृष्टी लोकांच्या कल्याणात होती.


पुढे शिवाजी राजे औरंगजेब यास लिहितात "हल्ली आपल्या कारकिर्दीत कित्येक किल्ले व मुलुख गेलेत व बाकी राहीले ते पण जात आहेत, सध्या उत्पन्न कमी झाले आहे सगळी कडे दारीद्र आहे त्यात जिजिया कराचा उपद्रव".
पुर्व आणी पछ्चिमे कडील देशात असे माहीत पडले आहे की हिंदुस्तान चा बादशाह फकीर,ब्राह्मण,शेवडे,सन्यासी,बैरागी,गरीब अनाथ फकीरांकडुन जिजिया कर घेतात व त्यात पुरुषार्थ समझतात व यामुळे बादशहाचे नाव खराब होत आहे.

शिवाजी राजे औरंगजेबला  उपदेश देत आहेत कि तुमचे पूर्वज अकबर,जहांगीर,शाहजहान यांनी नेहमी लोकांचे कल्याण केले,पण तुम्ही जीजीया सारखे कर घेऊन त्यांचेच नाव खराब करीत आहात.
तर जिजिया कर हा गरींबावर अन्याय आहे व तो रद्द करावा व शेवटी लिहितात
राज्याचा सुर्य हा प्रतापाचे उद्याचलापासुन तेजस्वी आसो.




शिवाजीराजेंची कुराण बद्दल विशेष श्रद्धा

कुराण बद्दल राजेंच्या मनात खूप श्रद्धा होती,शिवाजी राजे कुराण मधील उपदेश देतात व लिहीतात,कुराण ही आस्मानी किताब आहे.ईश्वराची वानी आहे.
त्यात आज्ञा केलीली आहे ईश्वर साऱ्या जगाचा आहे आणि फक्त मुसलमानांचा नाही.
चांगवे किंवा वाईट जे काही आहे हे सर्व ईश्वर निर्मीत आहे
पुढे शिवाजी राजे लिहितात जेथे मस्जिद आहे तेथे देवाला स्मरुन बांग (आजान) देतात,व जेथे मंदिर आहे तेथे घंटानाद करतात.
म्हणुन कोणाच्याही धर्माला विरोध करणे म्हणजे ईश्वराच्या लिखानाला रद्द करण्यासारखे आहे व त्याला दोष देण्यासारखे आहे.
युद्धात जर कुराण सापडले तर राजे त्याला बाईज्जत आपल्या मुसलमान साथीदाराच्या हाती मशिदीत पाठवीत असे. राजेंची सेनेला सख्त ताकीद होती कोणीही कुराणास अथवा कोणत्याही स्त्रीला त्रास देवू नये.

याच्यातून काही विशिष्ठ संघटनांनी बोध घ्यावा व राजेंच्या आज्ञेचे पालन करावे.










हिंदु-मुस्लिम जातीवाद

त्या काळात जातिवाद हा विषय होता का हो ?
शिवाजी राजेंच्या काळात आशा जातीय दंगली वगैरे प्रकार नव्हता
जसे मी सांगितले शिवकाळात हिंदु-मुस्लिम जातीवाद हा खरतर मुद्दाच नव्हता,मुद्दा होता तो सरंजामशाही,बलुतेशाही,पाटीलकी,खोत यांची मक्तेदारी,वतनदाऱ्या संपवायचा
शिवाजी राजेंनी त्यांच्या उभ्या अयुष्यात एक ही मस्जिद किंवा दर्गा पाडली नाही.या उलट त्यांनी नेहमी मशींदींना दान व इनामे दिलीत,सुफींना दान व इनामे दिलीत.
सभासदाच्या बखरीत "मुलखात देव-देवस्थाने जागोजागी होती.त्यास दिवाबत्ती,नैवेद्य,अभिषेक स्थान पाहुण यथायोग्य चालविले.मुसलमानांचे पीर,मशीदी,दिवाबत्ती,नैवेद्द स्थान पाहुन चालविले "
यावरुन स्पष्ट होतं शिवाजी राजेंनी कधीही धर्मांमध्ये भेदभाव केला नाही व मंदिरांना मशीदींना बरोबरचा सन्मान दिला
आजचे शिवभक्त म्हणणारे शिवाजी राजेंचे अनुकरण करतील काय ?







शिवाजी राजे आणि त्यांचे वफादार मुस्लिम सेनानी

शिवाजीराजेंच्या सेनेत खुप मुसलमान सरदार होते,जे राजेचे वफादार होते.
शिवाजी राजेंचा दारुगोळा,तोफखाना जो सर्वात प्रमुख विभाग होता ते संभाळण्याची जिम्मेदारी एका मुसलमान सरदाराकडे होती त्याचे नाव होते  इब्राहीमखान.
तसेच शिवाजी राजेंनी कोकणात समुद्रात आरमार उभारले होते शिवाजी राजेंना खुब दुरदृष्टी लाभली होती.
ज्या प्रमाणे २००८ मध्ये मुंबई वर दहशतवादी हल्ला झाला त्या प्रमाणे दुश्मन समुद्रा मार्गे आक्रमण करु शकतो असा इशारा शिवाजी राजेंनी ३०० वर्षा पुर्वीच दिला होता
त्यासाठी शिवाजी राजेंनी कोकणाच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधला व अरमार उभारले व त्या आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलतखान याला केले होते, तो मुसलमान होता.
शिवाजी राजेंना आग्राहुन सुटका करताना त्यांना खास मदद केलेल्या व शिवाजीराजे साठी जिवाची बाजी लावली तो त्यांचा खास अंगरक्षक,आग्रा सुटकेच्या वेळी शिवाजी राजेंचा आळ घेऊन झोपलेला साथीदार हिरोजी फर्जंद चे पाय चेपीत होता त्याचे नाव होते मदारी मेहेत्तर आणि तो एक मुसलमान होता.१६-१७ वर्षाच तो पोरगा राजेंच्या फार मोठा विशावासातला,अत्यंत प्रामाणिक,हरघडी कुठलेही काम करणारा.राजेंच्या फार मर्जीतला होत. नंतर राजेंच्या गादीचा सेसेचा हक्क त्याला देण्यात आले,आजही रायगडावर त्याची कबर आहे.
शिवाजी राजेंचा एकमेव मुसलमान वकील होता,त्याचे नाव काज़ी हैदर होते, जो सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाशी बोलनी करण्यासाठी राजेंकडुन गेला होता.
जेव्हा सिद्दी जौहर ने पन्हाळगडाला वेढा दिला तो वेढा उठवण्यासाठी नेताजी पालकर बरोबर खांद्याला खांदा देउन लढला तो मुसलमान सेनानी होता सिद्दी हिलाल व त्याचा मुलगा वाहवाह,या लढाईत सिद्दी हीलालचा मुलगा वाहवाह सिद्दी जोहर च्या सेनेच्या हाती जखमी झाला व त्याला  कैद करण्यात आले. सिद्दी हीलाल हा एक शिवाजी राजेंचा खास सैनिक होता.
तश्याच प्रकारे शिवाजी राजेचा खास सेनानी शिलेदार होता शामाखान ज्याचा उल्लेख सभारद बखरीत पान नं. ७६ वर आहे.
"मराठ्यांच्या इतिहासाची साधने" या ग्रंथात खंड १७ पान १७ वर "शिवाजी चा सरनोबत" म्हणुन नुरखान ला संबोधण्यात आले आहे.
एव्हढच नव्हेतर १६४८ मध्ये शिवाजी राजेंच्या सेनेत विजापुरच्या लष्करातले ७०० पठाण येऊण मिळाले होते.
शिवाजी राजेंनी मशिद,दर्गा यांना दान केल्याचे पुरावे आढळतात.






शिवाजी राजे मुस्लिम विरोधी होते का ?

शिवाजी राजेंनी मशिद,दर्गा यांना दान केल्याचे पुरावे आढळतात.
शिवाजी राजे मुस्लिम साधु,पीर,फकीर यांना सुध्दा मान सन्मान देत असे त्यात "याकुत बाबा " यांना शिवाजी राजे गुरु मानत असे.
शिवाजी राजेंनी त्यांच्या सैनिकांना सक्त ताकीद दिली होती,लढाईत कोणत्याही मशिदीस,कुराणास अथवा स्री त्रास देऊ नये.जर कुराण ग्रंथ हाती आला तर तो पुज्यभावाने आपल्या मुसलमान सैनिकाच्या हाती मशिदीत पाठवत असे.

शिवाजी राजेंना कुराण बद्दल विशेष आदर होता,त्यांची अशी मान्यता होती की कुराण हा आसमानी ग्रंथ आहे व कुराण ही ईश्वरची वानी आहे.
मशिदीत बांग (आजान ) देतात म्हणजे ईश्वराची स्तुतीच करतात.
ईश्वर फक्त मुसलमानांचा नसुन तमाम लोकांचा आहे मग ते बरे असो किंवा वाईट.
शिवाजीराजेंनी धर्मग्रंथाचा आणि पुजास्थानाचा अवमान कधीच केला नाही, युद्धाच्या वावटळीत धुळीत पडलेली कुराणाची प्रतही राजेंनी सदैव आदराने जतन केली व नव्या मुक्कामावर मुसलमान धर्माचा माणूस पाहून त्याच्या हवाली केली. कारण "सूड"ही शिवाजीराजेंची प्रेरणा नव्हे. तो एक संयमी,आदर्श व्यक्ती होता. तो जनतेच्या स्वातंत्राचा नेता होता. जनता त्याला ईश्वरी अवतार मानीत असे.




सैन्य प्रशिक्षक शिवाजी राजे 


तो काळ सैन्याचा होता,लढायांचा होता, मुघलशाही,निजामशाही,आदिलशाही आणि मराठे यांच्यात आपआपसात लढाया होत असे,सैन्य ज्या गावातून जात असे तेथील प्रजेला त्रास देत असे त्यांचे धान्य,संपत्ती लुटत असे एव्हडच नव्हे तर सुना-लेकींवर सैन्य अत्याचार करीत असे,शेतकऱ्याच्या शेतातुन जाऊन सैन्य पुर्ण उभे शेत भुई सपाट करीत असे,त्रस्त जनता कोणाही कडे दाद मागु शकत नव्हती,दाद मागायची कोणाकडे?  अशा काळात एक ओअँसीस सारखा शिवाजीराजे आले त्यांनी सैन्याला योग्य प्रशिक्षण फक्त लढण्याचे, गणिमी काव्याचे नाही तर जनसेवेचे प्रशिक्षण दिले आणि रयतेचे सौरक्षण करणे तुमचे प्रथम कर्तव्य आहे याची जान करून दिली. 

राजेंचा सैन्याला हुकुम होता शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामाने,सैन्यातील कोणीही सुना-लेकीं बरोबर गैर वर्तणुक केल्यास त्याला कठोर शिक्षा होत असे,सैन्याला निर्देश होते कोणत्याही उभ्या शेतातुन सेना जाणार नाही,कोणतेही वैरण चारा लागल्यास ते रोख रक्कम देऊण खरेदी करण्यात यावे.
त्यामुळे जनतेला वाटू लागले, हे माझे राज्य आहे, हे माझे स्वराज्य आहे.



स्त्री रक्षक शिवाजी राजे

शिवाजीराजेंना स्त्रियांबद्दल विशेष आदर होता,स्वराज्यात कोणत्याही स्त्रीला,सूना-लेकींना त्रास देवू नये असे त्यांचे आदेश होते.
परस्त्रीला माता मानणाऱ्या शिवाजी राजे यांनी ३५० वर्षा पुर्वी स्वराज्याची संकल्पना मांडली.
त्या काळात सरदार,वतनदार,जमीनदार,देशमुख,पाटील दिवसा ढवळ्या सुना-लेकींवर आत्याचार करत,त्यांची अब्रु लुटली जात होती व कुणा कडेही दाद मागता येत नव्हती.ज्यांच्याकडे दाद मागायची ते रक्षकच भक्षक बनले होते,व त्यांनाच वतने,इनाम,मानमरातब,पदव्या मिळत होत्या.
राजे जेव्हा सत्तेवर आले त्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली.त्याच्या त्या राज्यात माय-बहीणींवरील आत्याचारींना कठोर शासन होवू लागले.
रांझ्या च्या पाटलाची गोष्टतर सर्वांना माहीतच आहे,जेव्हा पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या जवान पोरीची अब्रु लुटली,व पोरीने आत्महत्या केली तर सर्व राज्यात हळहळ व्यक्त होत होती,राजेंच्या कानावर बात पडताच त्यांनी मुसक्या बांधुन पाटलाला दरबारात आणले व त्याचे हात पाय तोडण्याची शिक्षा सुनावली.
विचार करा आज जर राजे ह्यात असते तर ह्या नराधमांवर जे आज ही सुना-लेकींवरच काय तर या शिवभुमी ला शर्म येईल अशा कवळ्या कळ्यांवर सुध्दा आत्याचार करतात त्यांच्याशी काय केले असते ? त्यांचे हात पाय तोडुन कडेलोट केले असते का नाही ?
आज राजेंना स्वर्गात अश्रु आनावर होत असतील.
लढाईत किंवा लुट करताना कोणत्याही धर्मांच्या का आसो कोणत्याही स्त्री ला त्रास देता कामा नये अशा स्पष्ट आज्ञा होत्या शिवाजी राजेंचे त्यांच्या सेनेला.
आजच्या नाम मात्र संघटना,सेना,जातीय दंगली घडवितात व परस्त्रीवर अत्याचार करतात व शिवाजीचा जयघोश करत जात.
विचार करा आज शिवाजी राजे जिवंत असते तर अशा भामट्या शिवभक्तां बरोबर काय न्याय केला असता ?
१८७६ शिवाजी राजेंचा सेनापती सकुजी गायकवाड याने बेळवाडीचा किल्ला सर केला व सूड भावनेने महीला किल्लेदार सावीत्रीबाई देसाईवर बलात्कार केला,राजेंना बातमी कळताच राजे संतापले व त्यांनी सेनापती सकुजी गायकवाड चे दोन्ही डोळे काढण्याची शिक्षा सुनावली व त्याला जन्मभर तुरुंगात डांबले.
विचार करा आज शिवाजी राजे जिवंत असते तर ?
राजेचा हुकुम होता कोणीही मोहीमेवर जाताना बटकिनी,कलावंतीनी,कुणबिनी बरोबर घेऊ नये,कोणीही स्त्रीस बटकिनी बनवु नये. 
कोणीही मुस्लिम स्त्री सापडल्यास जो पर्यंत तिचे नातलग तिची सुटका करुन घेऊन जात नाही राजे स्वतः तिची काळजी करीत असे.
कल्याणच्या आदीलशाहीचा शिवाजी राजेंच्या सेनेनी धुव्वा उडविला,तेव्हा तेथे कल्याणच्या सुभेदाराची मुस्लिम सुन हाती लागली,राजे खुष होतील म्हणुन पुण्याला पाठविण्यात आली पण राजेंनी सैनिंकाना खडसावले व सुबेदारच्या सुनेची चोळी बांगडी केली,शिवाजी राजेंच्या मुखातुन उद्गार निघाले "आपली आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते " व तिला बा इज्जत परत घरी पाठवण्यात आले.
असे होते आमचे शिवाजी राजे.

एक उत्कृष्ठ अर्थतज्ञ शिवाजी राजे  

शिवाजी राजे हे एक उत्कृष्ठ अर्थ जाणणारे होते, जशी त्यांच्या हतात सत्ता आली ताबडतोब त्यांनी अर्थ व्यवस्थेत आमुलाग्र बदल केले,ज्या प्रमाणे आताच्या काळात ग्राम पंचायत,आमदारकी,खासदारकी काही ठरावीक घराणी,ज्यांच्या कडे मँनपॉवर मनीपॉवर आहे असे नेता सत्तेत वर्षोन वर्षे बसलेले आहेत तसेच त्या काळी काही घराणी "वतन" घेवुन बसलेली होती,राज्य कोणाचे ही असो आदिलशाही किंवा निजामशाही हे "वतनदार" रातोरात अपले ईमान बदलत असायचे पण वतन मात्र नाही सोडयचे जसे आजचे नेता रातोरात पक्ष बदल करतात तसे.
    पण जेव्हा राजे सत्तेवर आले त्यांनी ताबडतोब "वतनदारी " बंद केली.जुनी वतने समाप्त केली व कर पध्दतीत आमुलाग्र बदल केले,शेताचे मोजमाप केले व ठराविक कर आकारणी केली,शेतमजुरांवरील ( भुदास ) होणारे जुलुम संपवले व जमीन महसुलाचे मक्ते द्यायची पध्दत बंद केली.प्रत्येक शेतमजुराला शेती करण्यासाठी जमीन देण्यात आली, लावण्यासाठी बी-बीयाणे दिली,बैल जोडी दिली व उगेल त्या पिकावरच कर आकारणी.शेतकऱ्याच्या पिकावर वतनदाराचा हक्क संपवण्यात आला,जर उगवलेच नाही,कींवा दुष्काळ झाला तर कर माफ, सरकारी खजिन्यातुन रयतेला मदत मिळे.
कुळाला शिवाजी राजे यांनी स्थिरता आणली व आर्थिक सुधारणा केल्या.





शिवाजीराजे विरुध्द मराठा व राजपूत 

या विषयाबद्दल आम्हाला कोणत्याही शाळेतील इतिहासातील पुस्तकात का सांगण्यात आले नाही कुणास ठाऊक ? शिवाजी राजे हे मराठ्यांविरोधी सुद्धा लढले ?
येथे मला पुन्हा नमुद करावेसे वाटते शिवाजी राजे यांनी खुप मोठे कार्य हाती घेतले होते ते म्हणजे स्वराज्य स्थापनेचे. 
त्या काळात मराठे,राजपुत,सिख हे मोठमोठी घराणी आदीलशहा,निजामशहा,मोघल यांच्या कडे सेनेत सरदार,किल्लेदार,शिलेदार सारख्या मोठमोठ्या पदावर वगैरे होती व वतने,इनामे,जागीरदाऱ्या हासील करण्यासाठी हे लोकं रणांगणात पराक्रम करीत असे.
शिवाजीराजेंच्या जीवनातील सर्वात जास्त क्लेश दायक व दुखाची गोष्ट युवराज संभाजी राजे मोघलांकडे जाने हा आहे. मोठ्या मिनतवारीने संभाजीराजेंना परत आणावे लागले. 

जेव्हा शिवाजी राजेंनी स्वराज्य स्थापन केले व सर्व वतनदाऱ्या,जमीनदाऱ्या समाप्त केल्या, रयते चे राज्य आले, तेव्हा हे सर्व हिंदु सरदार शिवाजीराजेंच्या विरुद्ध उभे राहिले.  
त्या काळात शिवाजीराजे यांचं स्वराज्याचं स्वप्न म्हणजे वेळेच्या खुप आगोदरची कल्पना होती (ahead of time) व ह्या सरदार घराण्यांना स्वराज्याची कल्पना नको होती.
खुद्द शिवाजी राजेंच्या रक्तातले नातलग राजेंच्या विरोधात उभे राहीले होते.
शिवाजी राजेंचे आजोबा व जिजामाता चे वडील लाखोजी जाधव जे सिंदखेड राजाचे राहणारे होते ते निजामशाही मध्ये सरदार होते.
जसे मी सांगीतले शिवाजी राजेंचे वडील शहाजी राजे कधी आदीलशाही,कधी निजामशाही व कधी मुगालशाही मध्ये सरदार होते.सरदेसाई यांचा ग्रंथ "मराठी रियासत " मध्ये म्हंटले आहे "विजापुरकरांशी युध्द म्हणजे हिंदु-मुसलमानातील युध्द नव्हे.अशा प्रकारचे स्वरुप त्या युध्दास येणे शक्य नव्हते " शिवाजीची मोठी अडचण विजापुरकरांच्या ताब्यात गुंतलेली मोठी मोठी सरदार घराणे होती.त्यांच्या मनात शिवाजी बद्दल आदर किंवा पुज्यबुध्दी नव्हती.मोहीते,मोरे,सावंत,दळवी,सुर्वे,निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभापासुन कमी-जास्त प्रमाणात शिवाजीच्या विरुध्द होते."
येथे मला नमुद करावेसे वाटते विजापुरला आदिलशाह ची सत्ता होती व शहाजीराजे आणि खुद्द अफज़लखान ज्याचा शिवाजी राजे यांनी वध केला तो आदिलशाही मध्ये बाकीच्या मराठे घराण्याप्रमाणे सरदार होते.
शिवाजीराजेंना प्रामुख्याने घाटगे,खंडागळे,घोरपडे,मोहीते,निंबाळकर,डबीर,मोरे,बादल सावंत,सुर्वे,खोपडे,पांढरे,कोकणचे देसाई,मावळचे देशमुख वगैरे प्रमुख मराठे-हिंदु घराण्यांचा विरोध होता.
शिवाजीराजेंचे अगदी जवळचे असलेले त्यांचे भाऊबंद व्यंकोजी भोसले व सख्खा चुलत भाऊ मंबाजी भोसले राजेंच्या विरोधात होते.
आई कडुन नातेसबंध असलेले जगदेवराव जाधव,रधोजी माने हे सुध्दा राजेंच्या विरोधात होते.
शाहीस्तेखान जेव्हा स्वराज्यावर चाल करुन आला तेव्हा मराठा घराण्यातील सुखाजी गायकवाड,दिनकर राव काकडे,रंभाजीराव पवार,सर्जेराव घाटगे,कमलोजीराव काकडे,जसवंतराव काकडे,त्र्यंबकराव खंडागळे,कनकोजीराव गाडे,अंताजीराव खंडागळे,दत्ताजीराव खंडागळे हे मराठे सरदार होते व एव्हढच नव्हे तर शिवाजी राजेंच्या रक्तातील त्र्यंबकरावजी भोसले,जिवाजीराव भोसले, बालाजीराव भोसले,परसोजीराव भोसले ही मंडळी सुध्दा शाहीस्तेखान बरोबर शिवाजीराजे  विरोधी उभी होती.
सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधव आणी रुस्तमराव जाधव हे शाहीस्तेखानाच्या फौजमध्ये सरदार होते.
लोणीचे कृष्णाजी काळभोरपण शाहीस्तेखानाला सामील झाले होते.
या सर्व सरदारांना त्यांचे वतन महत्वाचे होते
शिवाजी राजे या मराठे सरदाऱ्यांचे वतनदाऱ्या खतम करीत होते  व रयतेचं कल्याण करीत होते म्हणुन या सरदार घराण्याना शिवाजीराजे नको होते.
शेवटी राजपुत मिर्जाराजे जयसिंग यांनी पुरंदर च्या किल्ल्याला वेढा दिला व शिवाजीराजेंना मुघलांबरोबर तह करावे लागले व नंतर तहांतर्गत काही किल्ले मुघलांना द्यावे लागले व औरंगजेबला भेटण्यासाठी आग्रा येथे जावे लागले.
शिवाजीराजेंनी पेटवलेली जोत कर्ते राजे व सेनापती नसताना शिवाजीराजेंच्या आकस्मिक मृत्यूनंतर सत्तावीस वर्ष मराठ्यांनी झुंझ दिली व जे शिल्लक राहिले तेच खरे स्वराज्य. 

इथे एक गोष्ट लक्षात घ्या राजेंची लढाई हिंदुत्व या केद्रबिंदु भवती नव्हती,तर स्वराज्यासाठी होती.

हा लेख विविध लेखांतून घेतलेले संकलन आहे कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास कृपया निदर्शनास आणावे,चूक भूल माफ करावे.


धन्यवाद

संपर्क

शिवप्रेमी,इतिहासप्रेमी, देशप्रेमी 

डॉ रियाज पठाण
drriazpathan@gmail.com 


संकलन 

१. शिवाजी कौण होता ? 
२. महाराष्ट्रातील किल्ले 
३. छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य 
४. मदारी मेहेत्तर,रामजी पांगेरा,कोंडाजी फर्जंद
५. दगलबाज शिवाजी 
६. महाराष्ट्रातील प्रसिद्ध सरदार घराणी 
७. सेनापती हंबीरराव मोहिते 
८. Chatrapati Shivaji Maharaj,A Hero For Modern India 



No comments:

Post a Comment