Wednesday, 29 August 2018

अशी असते मैत्री.

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एकमेकांचा आधार बनणं,

मैत्री म्हणजे अतूट विश्वास, मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.



मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट..
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..

मैत्री ठरवून कधीच होत नाही, 
हाच मैत्रीचा एक फ़ायदा आहे...
आणि मैत्रीला कुठले नियम नाहीत, 
हाच मैत्रीचा पहिला कायदा आहे ..!!!



आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. 
नाहीतर... 

तासभर साथ देणारी माणसं बस मध्ये पण भेटतात. 


घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही.
घड्याळ विकत घेऊ शकता पण गेलेली वेळ नाही.
मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही.
मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही.
पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही.
औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही.
रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.
पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवावे 
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नये.
पैश्याची पूजा जरूर करावी पण पैश्याचे गुलाम बनू नये.
माणसासाठी पैसा बनला आहे. 
पैश्यासाठी माणूस नाही.
आपले मित्र हे आपले धन आहे.
वेळ काढा भेटा बोला. 
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण 
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,

पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते

मनाला जखमी व्हावे लागते ... 

अशी असते मैत्री. 




No comments:

Post a Comment